Ad will apear here
Next
शासकीय रुग्णालयांत पॅथलॅब
प्रातिनिधिक फोटोमुंबई : राज्यातील विविध शासकीय रुग्णालयांत रक्त, लघवी आणि तत्सम वैद्यकीय नमुने चाचण्या करून घेण्यासाठी आता वैद्यकीय प्रयोगशाळा (पॅथॉलॉजी लॅबोरेटरी) सेवा उपलब्ध होणार आहे. यासाठी केंद्र सरकारचा उपक्रम असलेल्या ‘मेसर्स एचएलएल लाइफकेअर लिमिटेड’ या कंपनीसमवेत महाराष्ट्र राज्य आरोग्य संस्थेने करार केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने आणि मार्गदर्शनाने हा उपक्रम कार्यान्वित करण्यात आला आहे.

केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनांनुसार, राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत राज्यातील आरोग्य संस्थांमध्ये बाह्यस्थ संस्थेमार्फत वैद्यकीय प्रयोगशाळा सेवा (लॅबोरेटरी सर्व्हिसेस) उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्र राज्य आरोग्य संस्थेद्वारे प्रयत्न करण्यात येत होते. मेसर्स एचएलएल लाइफकेअर लिमिटेड यांच्यासोबत पाच वर्षांसाठी करार करण्यात आल्याने या प्रयत्नांना यश आले आहे. करारानुसार ही कंपनी राज्यात विविध ठिकाणी लॅब स्थापन करणार आहे. लॅबला संलग्न शासकीय रुग्णालये व संस्थांमधून नमुने संकलित करून आवश्यक वैद्यकीय चाचण्या करण्यात येतील. या चाचण्यांसाठी आकारले जाणारे शुल्क सरकारकडून दिले जाणार असून, त्यामुळे रुग्णांना ही सेवा विनामूल्य मिळणार आहे.

आतापर्यंत पुणे, ठाणे, नंदुरबार, जालना, बीड, रायगड, नागपूर, औरंगाबाद, वर्धा, रत्नागिरी, धुळे, गोंदिया, जळगाव, नाशिक, पालघर, सिंधुदुर्ग या १६ जिल्ह्यांमधील काही आरोग्यस संस्थांमध्ये, काही प्रमाणात ही सेवा उपलब्ध झाली आहे. टप्प्याटप्प्याने राज्यातील इतर आरोग्य संस्थांमध्ये त्याचा विस्तार होणार आहे.

मेसर्स एचएलएल लाइफकेअर लिमिटेड यांचे कर्मचारी शासकीय आरोग्यसंस्थांमध्ये रुग्णांचे वैद्यकीय नमुने संकलित करण्यासाठी नेमून दिलेल्या वेळेत हजर राहणार आहेत. प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये सकाळी आठ ते दुपारी १२ वाजेपर्यंत; ग्रामीण रुग्णालये, तसेच ५० खाटांपेक्षा कमी क्षमतेच्या उपजिल्हा रुग्णालयांमध्ये सकाळी आठ ते दुपारी एक वाजेपर्यंत; १०० खाटांपेक्षा जास्त क्षमतेची उपजिल्हा रुग्णालये, स्त्री रुग्णालये, सर्वसाधारण रुग्णालये, मनोरुग्णालये आणि प्रादेशिक संदर्भसेवा रुग्णालये यांमध्ये सकाळी आठ ते दुपारी दीड आणि सायंकाळी चार ते साडेसहापर्यंत नमुने संकलित करण्यात येणार आहेत. अतिदक्षता व वैद्यकीय आपत्कालीन स्थितीच्या वेळी ‘बोलावताच हजर’ या तत्त्वानुसार २४ तास सेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये २५ प्रकारच्या, ग्रामीण रुग्णालये, तसेच ५० खाट क्षमतेच्या उपजिल्हा रुग्णालयांमध्ये ३२ प्रकारच्या चाचण्या करणे शक्य होणार आहे. १०० खाटांपेक्षा जास्त क्षमतेची उपजिल्हा रुग्णालये, स्त्री रुग्णालये, सर्वसाधारण रुग्णालये, मनोरुग्णालये आणि प्रादेशिक संदर्भसेवा रुग्णालये यांमध्ये सुमारे ५२ प्रकारच्या चाचण्या करण्यात येतील. या संकलित केलेल्या नमुन्यांचे अहवाल संबंधित आरोग्य संस्थांच्या ई-मेलवर, तसेच डॅश बोर्डवर विहित कालावधीत उपलब्ध करून देण्यात येतील. या अहवालांच्या प्रती दुसऱ्या दिवशी आरोग्य संस्थांच्या संबंधित अधिकाऱ्यांकडे देण्यात येतील.

राज्यातील लहान शहरांमध्ये विशेषत: खेडेगावांमधील जनतेला, तसेच गरजू आणि आर्थिकदृष्ट्या कमकुवत वर्गातील रुग्णांना याचा मोठा फायदा मिळणार आहे. ग्रामीण भागातील जनतेला रक्त नमुने व तत्सम वैद्यकीय चाचण्या करून घेण्यासाठी नागरी भागांमध्ये धाव घ्यावी लागते आणि प्रसंगी निदान होईपर्यंत उपचारांमध्ये विलंब होतो. मुख्यमंत्री फडणवीस, तसेच आरोग्यतमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी ही बाब लक्षात घेऊन रुग्णांना सहजसुलभपणे वैद्यकीय प्रयोगशाळा सेवा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न केले आणि हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे.
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/GZJSBC
Similar Posts
१०१ रुपयांच्या त्या ‘अनमोल’ भेटीने मुख्यमंत्री भारावले! मुंबई : राज्याच्या मुख्यमंत्र्यांवर वाढदिवसानिमित्ताने शुभेच्छांचा वर्षाव होणे, ही दर वर्षीचीच गोष्ट; पण यंदाच्या वाढदिवशी मुख्यमंत्री सहायता निधीला मिळालेल्या विशेष भेटीमुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भारावून गेले आहेत. ती भेट फक्त १०१ रुपयांची आहे; मात्र तिचे मूल्य अनमोल आहे.
मुख्यमंत्रिपदी देवेंद्र फडणवीसच; अजित पवार उपमुख्यमंत्री मुंबई : कित्येक दिवस चाललेल्या चर्चांच्या फैरींनंतर एका रात्रीत महाराष्ट्राच्या राजकारणाने अचानक दिशा बदलली आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतली. उपमुख्यमंत्री म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी शपथ घेतली आहे. आज सकाळी (२३ नोव्हेंबर) या दोन्ही नेत्यांनी पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली
क्रीडा क्षेत्रालाही हवेत ‘अच्छे दिन’ सत्तापरिवर्तनानंतर इतर क्षेत्रांत होत असलेल्या सुधारणांप्रमाणेच क्रीडा क्षेत्रातही ‘अच्छे दिन’ यावेत, अशी अपेक्षा आहे. त्यासाठी बरेच प्रयत्न करण्याची गरज आहे. देवेंद्र फडणवीस सरकारच्या त्रिवर्षपूर्तीनिमित्ताने क्रीडा क्षेत्रातील आव्हानांचा आणि अपेक्षांचा आढावा घेणारा हा लेख...
‘राज्यातील सर्व शाळा होणार डिजिटल’ मुंबई : ‘शालेय शिक्षण विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र अभियानांतर्गत राज्यातील शाळा डिजिटल करण्यात येत आहेत. डिसेंबर २०१८पर्यंत राज्यातील सर्व शाळा डिजिटल होतील. त्यातून विद्यार्थ्यांना या अभियानांतर्गत आनंददायी, गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळेल,’ असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language